Share

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : वडिलोपार्जित शेतीच्या व्यवहारातील पैसे न देता उलट व्याजाने दिलेल्या पैशांवरून आर्थिक अडचणीत आणून मानसिक त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजीनगरात घडली होती. नागनाथ तुकाराम कलालडे (रा.शिवाजीनगर, गारखेडा परिसर) असे मयताचे नाव आहे.

मयत नागनाथ कालालडे यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या व्यवहारातील पैसे प्रकाश कटारे, अनिल होगे पाटील, अशोक सुर्यवंशी यांच्याकडे बाकी होते. त्यामुळे नागनाथ कालालडे यांनी पैशासाठी तकादा लावला असता त्यांनी कलालडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच सुनील घंटे यांच्याकडून मयत कलालडे यांनी ५० हजार रूपये व्याजाने घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे परत दिल्यावरही सुनील घंटे हे एक लाख रूपये दे म्हणून नेहमी त्रास देत होते. तसेच घंटे यांनी कलालडे यांच्या नावावर एका दुकानातून बेड खरेदी करून त्याचे देखील पैसे दिले नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या नागनाथ कलालडे यांनी ३१ जानेवारी रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती.

याप्रकरणी नागनाथ कलालडे यांचा मुलगा शिवाजी कलालडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल होगे पाटील, अशोक सुर्यवंशी, अनिल घंटे, सुनील घंटे यांच्यासह एका महिलेविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!