Share

औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलनिमित्त शॉर्टफिल्म स्पर्धेचं आयोजन

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबादकर सिनेरसिकांसाठी एन आनंदाची बातमी आहे. आठवा औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (AIFF)ची घोषणा करण्यात आली आहे. ९ ते १३ एप्रिल २०२१ या काळात आठवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल होणार आहे. हा महोत्सव औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमधील आयनॉक्समध्ये होणार आहे.

दरम्यान फेस्टीव्हलच्या निमित्ताने नाथ ग्रुप, एमजीएम प्रस्तुत आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतिने मराठवाड्यातील युवा सिनेविद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आठव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त युवा सिनेविद्यार्थ्यांसाठी शॉर्टफिल्म स्पर्धा ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे.

शॉर्टफिल्म स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी
* निर्माता व दिग्दर्शक मराठवाड्यातीलच असावा
* लघुपट १५ मिनिटांचा असावा
* लघुपटातील तपशील हा स्वतः चित्रित केलेला, मालकीचा असावा
* निर्मिती ही १ जानेवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळातील हवी
* प्रवेशासाठी अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ आहे
* उत्कृष्ट लघुपटास रोख २५ हजारांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह मिळेल
* निवडक शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन महोत्सवात आयनॉक्स थिएटरमध्ये होईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!