🕒 1 min read
नवी दिल्ली : 21 डिसेंबर रोजी बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) आणि अॅडलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) यांच्यात सामना खेळला गेला. सिक्सर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात हंगामातील 16 वा सामना खेळला गेला, ज्यामध्ये सिडनीने 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह सिडनीने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या संघाने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
दरम्यान या सामन्यात असे काही घडले, ज्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. सिडनीच्या फलंदाजीदरम्यान अॅडलेडचा कर्णधार पीटर सिडलने सहकारी खेळाडूच्या गालावर किस केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Lots of love at @StrikersBBL ???? #BBL11 pic.twitter.com/3pZg8RjkRy
— 7Cricket (@7Cricket) December 21, 2021
डेनियल वॉरेलला पहिले षटक देण्यात आले होते त्यावेळी क्षेत्ररक्षणासाठी पीटर सिडल मैदनात होता. दुसरा चेंडू खेळण्यापूर्वी पीटर सिडलने वॉरेलचे चुंबन घेतल्याने दोघांमधील मैत्री पाहायला मिळाली. या खेळीदरम्यान ना पीटर सिडलला विकेट घेता आली, ना डेनियल वॉरेलला कोणताही बळी मिळू शकला. पीटर सिडलला उलटा फटका बसला. त्याने 3.2 षटके टाकली, 40 धावा दिल्या, हे देखील संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या संघाकडून सुनील गावस्कर यांना मोठ्या अपेक्षा, म्हणाले…
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
