लखनौ – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे एका जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी ट्विटर इंडियाच्या वतीने गाझियाबाद पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यात ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहकार्य करण्यासाठी सामील होऊ शकतात असे सांगितले आहे.
दरम्यान, गाझियाबाद पोलिस या उत्तरावर समाधानी नाहीत आणि पुन्हा ट्विटरला नोटीस पाठविण्याच्या ते तयारीत आहेत.गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना नोटीस पाठविली होती. यात ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांना लोणी पोलिस ठाण्यात येऊन एका आठवड्यात आपला जबाब देण्यास सांगितले होते.
गाझियाबाद पोलिसांना ट्विटर इंडियाने दिलेल्या उत्तरात व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांनी सांगितले की ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासणीत सहभागी होऊ शकतात. मनीष माहेश्वरी म्हणाले की या वादाच्या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही.
गाझियाबादमध्ये एका मुस्लीम वृद्धाची दाढी कापून मारहाणीचा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला होता. यानंतर जय श्री राम न म्हटल्याने ही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण नंतर हे प्रकरण ताबीजशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात 10 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणारा उम्मेद पहलवान यालाही पकडण्यात आले आहे.या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये ट्विटरचे नावही समाविष्ठ आहे.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘अल्लाह’ म्हटल्याने योगाची शक्ती कमी होत नाही! काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- बेरोजगार, गरीब आणि मूक बधिर असणाऱ्या हजारो लोकांचं ‘असं’ केले जात आहे धर्मांतर
- पवारांपाठोपाठ सोनिया गांधीनीही बोलावली बैठक, ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार गहन चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

