औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनची अवैधरित्या रित्या चढ्या भावाने विक्री केल्या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आरोपींनी मुळ जामीन अर्जावर सुनावीणा न झाल्याने अंतरीम (तात्पुरता) जामीनीसाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने तो मंजूर केला होता. दरम्यान शुक्रवारी दि.७ झालेल्या सुनावणीअंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी आरोपींचा अंतरीम व मुळ जामीन अर्ज नामंजूर केला.
दिपक सुभाषराव ढाकणे, मंदार भालेराव, अभिजीत तौर, अनिल बोहते अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज (55) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, १५ एप्रिल रोजी पुंडलीक नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी.बी. सोनवणे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करुन वरील चौघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी रेमडेसिवीर, मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त केला.
दरम्यान चारही आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी जामीनीसाठी अर्ज केला, मात्र मुळ अर्जावर सुनावणी न झाल्याने आरोपींच्या वतीने तात्पुरत्या जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानूसार २० एप्रिल रोजी न्यायालयाने तो मंजूर केला.
दरम्यान शुक्रवारी आरोपींच्या मुळ जामीन अर्जावर सुनावणी झाली असता, सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आरोपी मंदार भालेराव, अभिजीत तौर दोन हे मेडीकल चालक आहेत तर अनिल बाहेत हा घाटीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे. तीघे आरोपी मेडीकल फिल्डशी संबंधीत असल्याने त्यांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव असतांना देखील त्यांनी असे कृत्य केले त्यामुळे त्यांना जामीनीवर सोडल्यास समाजात वाईत संदेश जाईल. आरोपींना जामीनावर सोडल्यास काळ्याबाजार करण्याची परत शक्यता असल्याने आरोपींच्या जामीनीला विरोध केला. सुनावणी अंती न्यायालयाने आरोपींचा मुळ जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
