औरंंगाबाद : चिकलठाणा येथील विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जमिनीवर शासनाने आरक्षण टाकले असून विमातळाचे विस्तारीकरण करा अथवा विस्तारीकरणासाठी टाकलेले आरक्षण रद्द करा या मागणीचे निवेदन विमानतळा विस्तारीकरणग्रस्त कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना देण्यात आले. विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया रखडल्यामुळे येथील जमिनी शेतक-यांना कवडीमोल दराने विक्री करावी लागत असल्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळास आंतरराष्ट्रीय विमानतळाची मान्यता मिळाल्यावर विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने तब्बल १८२ एकर जमिनीवर ना विकास क्षेत्र हे आरक्षण लागू केले आहे. विमानतळाचे विस्तारीकरण होणार असल्याच्या चर्चा गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरू असून अजुनही विमानतळाचे विस्तारीकरण झालेले नाही. भारतीय विमान पतन प्राधिकरण औरंगाबाद यांच्या मागणीनुसार व मास्टर प्लॅन नुसार विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणा-या जमीनीचे भुसंपादन करण्यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास या कंपनीची नेमणूक नोव्हेंबर २०१७ साली झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षाच्या काळात या कंपनीने फक्त कागदोपत्री व्यवहार केले असून भूसंपादनाची कोणतीही कारवाई केली आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून विमानतळासाठी आरक्षीत असलेल्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले असून ते संथगतीने सुरू आहे. विमानतळ विस्तारीकरण होत नसल्यास शेतजमीनीवर टकलेले ना विकास क्षेत्र हे आरक्षण तात्काळ रद्द करून सदरील जमीनी रहिवासी झोनमध्ये सामील कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब दहिहंडे, सचिव सदाशिव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तो’ प्रसंग पाहून मंत्री अमित देशमुखही झाले भावूक!
- मोठी बातमी : पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांसह महिला आयोगाकडे सादर
- दुबईच्या राजकुमारीचा खळबळजनक व्हिडीओ; बंधक बनवून ओलिस ठेवले असल्याचा दावा
- लाच खाण्याची लाज सोडली मंडळ अधिकाऱ्याने शेतकऱ्याला मागितले ५० हजार
- ‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

