औरंंगाबाद : तक्रारदाराच्या मुलीच्या आणि नातेवाईकाच्या नावाने असलेल्या जमीनीतील खदानीचा आणि पिकाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.१६) गजाआड केले. अप्पासाहेब मुरलीधर गोराडे (रा.औरंगाबाद) असे लाचखोर मंडळ अधिका-याचे नाव आहे.
तक्रारदाराच्या मुलीच्या आणि नातेवाईकाच्या नावाने असलेल्या जमीनीतील खदानीचा आणि पिकाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी तक्रारदाराने चिकलठाणा येथील मंडळ अधिकारी अप्पासाहेब गोराडे यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावेळी मंडळ अधिकारी गोराडे यांनी तक्रारदारास खदानीचा आणि पिकाचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी ५० हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रूपये तलाठ्याला आणि २५ हजार रूपये आपल्यासाठी राहतील असे गोराडे यांनी सांगितले होते. तक्रारदारास लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक मारोती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलिस अंमलदार सुनिल पाटील, विजय बाम्हदे, मिलिंद इप्पर, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून लाचखोर अप्पासाहेब गोराडे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

