दुबई- दुबईची राजकुमारी शेखा लतीफा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मार्च 2018 मध्ये, लतीफा समुद्रातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडली गेली, जेव्हा ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. पण आता मंगळवारी तिच्या काही व्हिडीओ क्लिप्स समोर असून ज्यामध्ये ती स्वत: ला ओलिस ठेवले असल्याचा दावा करत आहे आणि तिचा जीव धोक्यात आला असल्याचे सांगत आहे. विशेष म्हणजे लतीफाला मार्च, 2018 पासून सार्वजनिकरित्या कुणीही पाहिलेले नाही.
बीबीसीने काही व्हिडिओ क्लिप प्रसारित केल्या आहेत. या क्लिपमध्ये लतीफा बाथरूममध्ये असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली आहे की, ‘मी याठिकाणी बंधक आहे आणि मला कैदी बनविण्यात आले आहे. माझ्या घरात दोन पोलिस आणि बाहेरील पाच पोलिस तैनात आहेत. दररोज मी माझ्या सुरक्षिततेबद्दल आणि आयुष्याबद्दल चिंता वाटत आहे.
"The situation is getting more desperate every day"
Secret messages, sent by Dubai’s Princess Latifa Al Maktoum, reveal details of how she has been held in captivity, after a failed attempt to leave Dubai in 2018https://t.co/3TyMLqAgwF pic.twitter.com/kDoCkeZrro
— BBC News (World) (@BBCWorld) February 16, 2021
दुसऱ्या क्लिपमध्ये लतीफा म्हणते की तिची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे.या तुरूंगात राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही मला यातून मुक्त व्हायचे आहे. लतीफाचे वडील शेख मुहम्मद बिन राशिद अल-मकतूम हे संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत.
2018 मध्ये, लतीफाने नौकेमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा कमांडोजने तिला अडवले आणि पुन्हा दुबईला नेले. नंतर, लतीफाने असा आरोप केला होता की, तिला जबरदस्तीने नावेतून खाली उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना पळण्याचा प्रयत्न करु नये म्हणून त्यांना मादक पदार्थांची इंजेक्शन्स दिली गेली असल्याचा देखील आरोप आहे .
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिने जाणून घ्या काय केलाय गुन्हा !
- भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- पुण्यात कोरोनाचा धोका वाढला; ‘या’ भागात होतेय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

