🕒 1 min read
नवी दिल्ली : इयत्ता बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली आहेत. ती विचारात घेऊन येत्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं होतं. दरम्यान, CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु आता बारावीच्या परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
परंतु आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. बारावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या चिंतेत आहेत. पालकांची आणि विद्यार्थ्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये लसीकरणा शिवाय बारावीची परीक्षा होऊ नये, अशी अपेक्षा असं मत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी ट्विट करत केंद्र सरकारकडे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे यंदादेखील पास पास केलं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे. 23 मे रोजी झालेल्या बैठकीत नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली होती.
12वीं की परीक्षा को लेकर बच्चे और पेरंट्स काफ़ी चिंतित हैं। वे चाहते हैं कि बिना वैक्सिनेशन, 12वी की परीक्षा नहीं होनी चाहिए
मेरी केंद्र सरकार से अपील है कि 12वीं की परीक्षा रद्द की जाए। पिछले performance के आधार पर उन्हें आँकलन किया जाए।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 1, 2021
दरम्यान, आज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ही बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही बैठक घेणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. आज संध्याकाळी ही बैठक होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारावीची परीक्षा कशी घ्यायची, याबाबतच्या पर्यायांवर सर्व राज्यातील शिक्षणमंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत काही महत्वाचा निर्णय घेणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी जबाबदारी पार पाडावी’
- परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार, आ. दानवेंच्या सूचनेवर मनपा आयुक्तांची ग्वाही!
- डब्लुटीसीच्या फायनलमध्ये ‘या’ कारणामुळे न्युझीलंड भारतीय संघाला भारी पडु शकतो: दिलीप वेगंसकर
- पापणी लवण्याआधी धोनीप्रमाणे क्षणात त्याने केले यष्टीचित; व्हिडीओ व्हायरल
- काही जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता तर ‘या’ जिल्ह्याच्या सीमा आता १५ जूनपर्यंत बंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
