🕒 1 min read
औरंगाबाद: कोरोनामुळे संपूर्ण देशात मोठे संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी लसीकरण सुरळीत झालेले नाही. औरंगाबादेतही ४०० विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेण्यासाठी प्रतिक्षेत आहे. मात्र लसीकरण झाल्याशिवाय हे विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीत परदेशी जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी आ.अंबादास दानवे यांनी परदेशी शिक्षणासाठी जवळपास ४०० विद्यार्थी जाणार असल्याने त्यांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे अशी सूचना केली. यावर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी या विद्यार्थ्यांचे लवकरच लसीकरण करण्यात येईल असे सांगितले.
महापालिका प्रशासनाने शहरातून विदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे. सद्यस्थितीत ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यातून वगळले आहे. शासनाकडून लसींचा हवा तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे शहरात अनेक जण लसीकरणापासून वंचित आहेत.
नुकतेच राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, असे मत व्यक्त केले आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने शासनाकडून पत्राद्वारे या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टच्या दरम्यान शिक्षणासाठी विदेशात जायचे, त्यांनी खासगी रुग्णालयात जावून स्वत:चे लसीकरण करुन घ्यावे. खासगी रुग्णालयांना ४५ आणि त्यावरच्या वयोगटासाठीच लसीकरण करा असे, बंधन शासनाने घातलेले नाही. १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना पोर्टलवर नोंदणी करुन खासगी दवाखान्यातून लस घेता येईल, असेही पत्रात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोना काळातील शिवसेनेचे काम उत्कृष्ट , मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना जिंकणारच !’
- निजामाच्या वंशजांचा शासकीय जागा हडपण्याचा डाव आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी उधळून लावला!
- Breaking : पदोन्नती आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक…
- काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी; सत्तांतराबाबत फडणवीसांच मोठं विधान
- दोन कोटी दोन लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद मनपा करणार ७ हजार पलंगाची खरेदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
