मुंबई : तामिळनाडूतील एका विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येचे पडसाद तामिळनाडूमध्ये चांगलेच उमटले आहेत. तेथील विधानसभेत तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारं विधेयक मांडण्यात आले. स्थानिक भाजप वगळता इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देत विधेयक मंजूर केलं. आता त्यानंतर महाराष्ट्रातही नीटची परीक्षा नको अशी भूमिका व्यक्त होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत नीट परीक्षेबाबत मत मांडले आहे. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये उघड झालेल्या गैरप्रकारांवर त्यांनी बोट ठेवलं. नीट परीक्षेला देशभरातून जवळपास १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावर्षी नागपूर असेल जयपूर अशा ठिकाणी हा पेपर लीक झाला. या घटनेमुळं अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी NEET गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. ही परीक्षा NCERT च्या बेसवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणूनच महाराष्ट्राने देखील तामिळनाडूप्रमाणे HSC च्या बेसवर मेडीकलला प्रवेश देण्याची भूमिका घ्यावी: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/ItT2woF4p8
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 21, 2021
‘यामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तामिळनाडूनमध्ये राज्य सरकारनं नीट बंद करून बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्रात व्हावा यासाठी भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासदंर्भात मागणी केल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.
अनेक ठिकाणी ‘नीट’मध्ये गैरप्रकार झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. ही परीक्षा NCERT च्या बेसवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणूनच महाराष्ट्राने देखील तामिळनाडूप्रमाणे बारावीच्या बेसवर मेडीकलला प्रवेश देण्याची भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसच पक्षाची भूमिका असल्याचं पटोले यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- …त्या सगळ्या गोष्टींच्या वेदना गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्या-प्रवीण दरेकर
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

