Share

‘सत्तार सिल्लोडला जिल्हा करू शकतो का ‘ ? रावसाहेब दानवेंचा सत्तारांना टोला!

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून शिवसेनेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची कुणकुण मला लागली आहे. मात्र गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन होत आहेत. या शाखा शिवसेनेच्या नाही तर सत्तारांच्या आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषांना बळी न पडता पक्षाशी प्रामाणिक राहा. असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड या ठिकाणी आयोजित सत्कार कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिला. सत्तार सिल्लोडला जिल्हा करू शकतो का? ते असे करू शकत असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी भूमिका यावेळी दानवेंनी घेतली.

रेल्वे राज्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात फुलंब्री गेले. त्यानंतर सिल्लोड याठिकाणी भाजपद्वारे आयोजित सत्कार समारंभात ते पोहोचले. या ठिकाणी बोलताना ते म्हणाले, थकारे गावागावात जाऊन फुटाने वाटल्यासारखी आश्वासने वाटत आहेत. गावागावात जाऊन सरपंचांना, सदस्यांना शिवसेनेत येण्यासाठी आश्वासन दाखवत आहेत.

मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की सत्तार ६०-७० कोटींपेक्षा अधिक निधी आणू शकत नाही. या मतदारसंघात त्यांच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त कामे मी केली आहेत. २४०० कोटींचे रस्तेही मीच बनवले आहेत. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना सत्तारांच्या आमिषांना बळी पडू नका, शिवसेनेच्या शाखा नसून या तर सत्तारांच्या शाखा आहे असा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे शिव संपर्क अभियान जोरदारपणे सुरू होते. अब्दुल सत्तार यांनीही गाव तिथे शिवसेना शाखा हे अभियान राबविले. त्यामुळे दानवेंच्या हे जरा जास्तच जिव्हारी लागले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!