मुंबई: कालचा (८ मार्च) दिवस शिवसेना नेत्यांवर पडलेल्या ईडी धाडी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद यामुळे गाजला. तर अजून एक विषय म्हणजे शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल आजारपणातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच ड्रायव्हिंग करताना दिसून आले. मात्र यावरूनच माजी राज्यमंत्री साडभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“साहेब गाडी चालवत विधान भवनात आले. आणि महाराष्ट्रा पुढचे सर्व प्रश्न संपले!”, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. दरम्यान यंदाचे अधिवेशन भाजपच्या आरोपांनी आणि मागण्यांनी अधिक गाजत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
साहेब गाडी चालवत विधान भवनात आले.
.
.
आणि महाराष्ट्रा पुढचे सर्व प्रश्न संपले!! pic.twitter.com/Lews5mR6s5— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) March 9, 2022
दरम्यान काल मुख्यमंत्री ठाकरे सभागृहाबाहेर एकदम अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. दरम्यान उद्धव ठाकरे यांना स्वतः ड्रायव्हिंग करीत असल्याने पाहून माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या गाडीभोवती प्रचंड घोळका केला. आणि दोन्ही सभागृहातील कामकाजात सहभागी होऊन ते सव्वापाच वाजता विधानभवनातून निघाले.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Session 2022 : फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपानंतर सत्ताधाऱ्यांची आज भूमिका कोणती?
WTC सुरु असताना सामना ड्रॉ केल्यामुळे क्रिकेट रसिक संतापले; पॅट कमिन्सने दिली मोठी प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवारांचे महत्वाचे योगदान! बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य
- वंचित बहुजन आघाडीकडून मुस्कान खानचा सत्कार करण्याचे जाहीर, भाजपचा विरोध


