नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनचे सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत भारतात आणण्याची धडपड भारत सरकारकडून करण्यात येत आहे. अशातच एक २१ वर्षाचा भारतीय विद्यार्थी परत मायदेशी परतण्याऐवजी युक्रेनच्या लष्करात भरती झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनसाठी लढणाऱ्या जॉर्जियन नॅशनल लीजन या लष्करी तुकडीमध्ये २१ वर्षीय सैनिकेश रविचंद्रन सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे आपला मुलगा असं काही करेल यावर त्याच्या कुटुंबियांचा विश्वास देखील बसत नाहीये. तामिळनाडूमधील कोइम्बतूर येथील रविचंद्रन हा युक्रेनमधील खार्किव्हमध्ये शिक्षण घेतोय. या बाबतीत रविचंद्रनच्या आईने सांगितले की, आपला मुलगा असं पाऊल उचलेलं याची कल्पना नव्हती असं म्हटलंय. तसेच पाच दिवसांपूर्वी त्याचं आमच्याशी बोलणं झालं होतं, असंही त्याच्या आईने सांगितलं.
युक्रेनच्या या युद्धात सहभागी होण्यासाठी पोर्तुगाल, ब्राझीलसारख्या देशांमधूनही अनेकजण पोलंडमार्गे युक्रेनमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेनमधील लष्कराच्या हवाल्याने खर्किव्ह इंडिपेंडण्टने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, ब्राझील, पोर्तुगाल, युनायटेड किंग्डम, लिथुआनिया, मॅक्सिको आणि भारतीय नागरिक स्वइच्छेने युक्रेनच्या लष्करी तुकड्यांमध्ये भरती होत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Session 2022 : फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपानंतर सत्ताधाऱ्यांची आज भूमिका कोणती?
WTC सुरु असताना सामना ड्रॉ केल्यामुळे क्रिकेट रसिक संतापले; पॅट कमिन्सने दिली मोठी प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवारांचे महत्वाचे योगदान! बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य
तब्बल ११८७ धावा झाल्या; तरीही सामन्याचा निकाल लागला नाही, नेमकं घडलं तरी काय! जाणून घ्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

