Share

संत्र्याचा कॅलिफोर्निया पिकविणाऱ्यांना वाचावा, कोणी केली ही मागणी    

Published On: 

नागपूर : संत्र्याचा कॅलिफोर्निया असलेल्या नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. पण, राज्य शासन याबाबत उदासिन आहे. संत्रा पिकाची नैसर्गिक नुकसानाची त्वरित भरपाई द्या, अशी मागणी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी तथा काटोल न. प. सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांनी केली आहे.

काटोल, नरखेड तालुक्यात तसेच संत्रा उत्पादन क्षेत्रात मोठय़ाप्रमाणात आंबिया बहाराची गळती झाली आहे, तर मृग बहर निसर्गाच्या असंतुलनामुळे भरलाच नाही. फार कमी बागा फुलल्या आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा उत्पादक बांधवांचे मोठय़ाप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

शासनांनी काढलेल्या आदेशानुसार आंबिया संत्रा फळांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. परंतु, संत्र्याच्या बागांचे सर्वेक्षण न करण्याचे तोंडी आदेश असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. म्हणून संत्रा फळांचे सर्वेक्षण व्हावे व संत्राउत्पादकांना न्याय मिळावा, याकरिता आमदार गिरीश व्यास, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना निवेदन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :-  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!