नवी दिल्ली : फिटनेस इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रातील काही व्यक्तींशी संवाद साधला. फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चासत्रात विराट कोहली सहभागी झाला होता. यावेळी मोदींनी विराट सोबत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. व विराटवर कौतुकाचा वर्षाव केला.
विराटचं कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, तुझं नाव आणि काम दोन्ही विराट आहेत. त्यानंतर मोदींशी संवाद साधताना विराट कोहली म्हणाला की, आम्ही ज्या काळात खेळायला सुरुवात केली त्या काळात खेळाची आवश्यकता बदलली होती. आपल्याकडील व्यवस्था खेळासाठी योग्य नव्हती आणि खेळासाठी मला खूप काही बदलावे लागले.
फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून देशभरातील निवडक व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चासत्रात भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, दोन वेळचा पॅरालिम्पिकमधील विजेता देवेंद्र झाझरिया, अभिनेता मिलिंद सोमण यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवांद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फिट इंडिया मोहिमेचा भाग बनल्यामुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे, असे ट्विट विराट कोहलीने करून आभार मानले आहे.
Join our Honourable PM and me at the Fit India Dialogue, tomorrow at 12 PM IST. See you there ???????? #NewIndiaFitIndia pic.twitter.com/Vf5LyTljyR
— Virat Kohli (@imVkohli) September 23, 2020
महत्वाच्या बातम्या :-
- लकमंत्री आदित्य ठाकरेंची महापालिका अपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट
- तू काय मदर तेरेसा लागून गेलीस का? वाचाळ कंगनाला सुनावले…
- मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकचं नाणारच्या व्यवहारात सामील; निलेश राणेंचे मोठे वक्तव्य
- मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची राज्य सरकारने केली शिफारस
- मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव; गृहमंत्र्यांनी केले कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

