अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर-मनमाड महामार्गाच्या गंभीर परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओची सीडी आ.राधाकृष्ण विखे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पाठवून कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता. त्यामुळे नगर-मनमाड महामार्गाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीने हा महामार्ग दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे.
नगर-मनमाड महामार्गाची वास्तव परिस्थिती आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपुढे मांडली. आ.विखे व आ.काळे यांचे म्हणणे ऐकल्यानंतर नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ४० कोटी रुपये निधी देणार असल्याचे माहिती दिली आहे.
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्ती संदर्भात मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात काल बैठक पार पडली. या बैठकीत आ.आशुतोष काळे व आ. राधाकृष्ण विखे यांनी नगर-मनमाड महामार्गाची झालेली दुरावस्था व हा महामार्ग तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपुढे मांडून रस्त्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली. ना.चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला आ.राधाकृष्ण विखे व आ.आशुतोष काळे यांच्यासह जिल्ह्याचे पालक सचिव नितीन करीर, रस्ते विभागाचे सचिव देबडवार, मुख्य अभियंता पद्माकर भोसले, जे.डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू, आर.आर.पाटील, उपअभियंता अंकुश पालवे, एस.आर.वर्पे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- तू काय मदर तेरेसा लागून गेलीस का? वाचाळ कंगनाला सुनावले…
- मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकचं नाणारच्या व्यवहारात सामील; निलेश राणेंचे मोठे वक्तव्य
- मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची राज्य सरकारने केली शिफारस
- मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव; गृहमंत्र्यांनी केले कौतुक
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कौतुकाचा वर्षाव म्हणले…


