मुंबई : आज(१८ नोव्हें.)माध्यमांशी संवाद साधतांना विविध मुद्द्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावं लागलं. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे. केंद्राच्या मदतीशिवाय कुणीही हवाई, समुद्री किंवा रस्त्याच्या मार्गाने देशाच्या सीमा पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करून त्यांना पळवून लावले.’
दरम्यान, अनिल बोंडे यांनी देशात ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे तिथं कुणीही दंगली करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही. यावर भाष्य करत संजय राऊत यांनी भाजपा महाराष्ट्रात दंगली घडवण्याची हिंमत करत आहे, असे प्रत्युत्तर दिले. तसेच सरकार पाहतंय. मी त्यावर बोलणार नाही. गृहमंत्रालय त्यावर पाहिल, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

