Share

‘…पण हे वानखेडे प्रकरण गंभीर आहे’, राऊतांचे वक्तव्य

Published On: 

पुणे : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच नवाब मलिक यांच्या जोरदार टीका केली जात आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. तसेच अनेक लोकांनी देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधतांना याविषयावर भाष्य केले आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर समाज माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,’समीर वानखेडे चुकीचं वागतायेत की नाही असं मी म्हणणार नाही. त्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे. मुंबईचे पोलीस तपास करत आहेत. नवाब मलिक यांनी जे पुरावे समोर आलेत ते खरे असतील तर ते प्रकरण गंभीर आहे इतकंच मी म्हणाले. या महाराष्ट्रात सर्व मराठी लोक आहेत. मात्र, आता जे चित्र दिसते आहेत ते एनसीबी विरुद्ध लढाई सुरू आहे. क्रांती रेडकर विरुद्ध नाही. आमच्या मराठी लोकांविरुद्ध कारवाई होते. अजित पवारांच्या बहिणी, भावना गवळी, अशोक चव्हाण यांचे नातेवाईक याच्यावर कारवाई केली जातेय. मग हे मराठी नाही का? मात्र हे वानखेडे प्रकरण गंभीर आहे,’ असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’देशातली कोणतीही आघाडी काँग्रेसला सोडून होऊ शकत नाही. २०२४ मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठीच गेल्या २ दिवसांपासून मी काम करत आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लहान आहोत, मात्र निवडणूक नक्की लढवू. देश फार मोठा आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. २०२४ मध्ये एकपक्षीय सरकार जाऊन आघाडी सरकार सत्तेवर येईल. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची ताकद आहे,’ असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!