पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील दररोज दोन ते तीन हजार रुग्णांची भर पडत असून शहरातील स्थिती बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला भेट देऊन भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘रेमडेसिवीर इजनेक्शनचा पुरवठा आटोक्यात आलाय आता ऑक्सिजनचा पुरवठा देखील होतोय. कोरोना काळात राजकारण करणं बरोबर जरी नसलं तरी कोविड आहे काहीही करून घ्या, हे चालणार नाही. राज्यातील लोकांनी आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- मोठी बातमी : ‘राज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यावर एकमत’
- ‘गोकुळ’चा रणसंग्राम : गोकुळमधून लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती; सतेज पाटलांचा हल्लाबोल
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

