पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने विरोधक त्यांच्यावर अनेकदा टीका करत असतात. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कोथरूडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.
विरोधकांनी त्यांच्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर टीकास्त्र सोडलं होतं. २०१९मध्ये कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरावेळी तत्कालीन फडणवीस सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं. त्यामुळे तेथील जनतेमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली होती. त्यामुळेच निवडून न येण्याच्या भीतीने चंद्रकांत पाटलांनी कोथरूडसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
यावर चंद्रकांत पाटलांनी याआधीच खुलासा केला होता. मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, ‘आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?,’ असं कळवल्याचं देखील सांगितलं.मात्र, ‘अमितभाईंनी आग्रह धरला तुम्हाला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है,’ असंही सांगितलं. त्यानंतर माझ्या नावाची कोथरूड मतदार संघातून घोषणा झाली.
आज चंद्रकांत पाटील यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी पुण्याचं तोंडभरून कौतुक केलं. ‘पुणे खरंच असं आहे की सर्वांना स्थायिक व्हावंसं वाटतं.’ यानंतर उपस्थितांनी प्रतिसाद देताच ‘देवेंद्रजी मी जाणार, मी कोल्हापूरला परत जाणार. विशेषतः माझे जे विरोधक आहेत त्यांना जरूर सांगा,’ असं म्हणताच सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील शेतकरी संवाद यात्रेत फडणवीस झाले बैलगाडीवर स्वार!
- शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन उद्योगपती मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना!
- ‘शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही’
- मनसेचा दणका ऍमेझॉनला, शहाणपण फ्लिपकार्टला!
- ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४३ हजारांची अवैध दारु जप्त


