Share

‘…पण सावध राहा बाबा. उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आलं म्हणजे झालं’, भुजबळांचे टीकास्त्र

Published On: 

जळगाव : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आज जळगावमध्ये आहेत. जळगावात ओबीसी आरक्षण हक्क परिषद पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना भुजबळ यांना मोदी सरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच, भिती वाटत असेल, तर भाजपामध्ये जावं, असा उपरोधिक सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला आहे.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की,’इथे सगळे जण अनेक मुद्द्यांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आला म्हणजे झालं. जो जो या कामात येईल, त्याला बरोबर उस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढायचं काम असतं हे. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठिमागे ते लागले आहेत’ असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आपल्या बोलण्यामुळे जे घाबरले असतील, त्यांनी भाजपात जावं, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला आहे. तसेच ‘हे सगळे असे होत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण जेव्हा एखादी भूमिका मांडतो, तेव्हा सावध राहा सगळे. जे घाबरले असतील, त्यांनी ताबडतोब भाजपामध्ये जायचं. मग तुम्हाला सगळे माफ. खरं तेच सांगतोय’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!