Share

‘…पण दिल्लीत कृषिमंत्री म्हणून दहा वर्षे बसून IPL सामने मात्र भरवता येतात!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. जवळपास महिनाभर कडाक्यातील थंडीत दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

या प्रकरणी अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महिना झाला असून शरद पवार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी केंद्र सरकारला ३० डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, ‘राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही’, असे खडेबोल शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘…पण दिल्लीत कृषिमंत्री म्हणून दहा वर्षे बसून IPL सामने मात्र भरवता येतात’ असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. दुसरीकडं, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून 34 दिवस आंदोलन करु. 26 जानेवारी रोजी दिल्लीतच प्रजासत्ताक दिन साजरा करु, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!