मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.
मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई, पुण्यासह नाशिक, पिंपरी-चिंचवड व अन्य काही शहरातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातच, ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने खबरदारीचे पावले उचलले असल्याचं दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याआधीच महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी ३१ डिसेंबरनंतर शाळा सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र, आता १ जानेवारी पर्यंत शाळा सुरु होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिलाने उडवली कंगनाची खिल्ली
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- ‘केंद्र सरकारने कृषी कायदे रेटले, दिल्लीत बसून शेती करता येत नाही’
- ग्रामपंचायत : इच्छूकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’

