नाशिक : देशासह राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामध्ये अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. नुकतेच कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाल्याची दुखःद घटना घडली आहे. आता नाशिक मध्ये देखील एका लोकप्रतिनिधीला कोरोणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्पना पांडे यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह महापालिकेला मोठा धक्का बसला आहे.
कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवसेनेच्या रणरागिनी अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे कोरोना काळातही त्या फ्रंटालाईनवर उतरुन काम करत होत्या. कोरोना काळात रुग्णाला रुग्णालय मिळवून देणे, औषधाची सोय करणे, जनजागृती करणं, यासारखी अनेक लोक हिताची कामं त्यांनी केली. नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती.
महत्वाच्या बातम्या .
- पत्रकार दातीर हत्या प्रकरणाला धक्कदायक वळण, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्यावर आरोप !
- उस्मानाबाद; भरधाव कार घुसली हॉटेलात, दुकाने बंद असल्याने मोठा अनर्थ टळला!
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- “महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे का ?, सगळ्यांची ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती घ्या”
- CSK-DC सामन्यात दोन भावांमध्ये झाली काटे की टक्कर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

