उस्मानाबाद: कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. घर फोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयाची रोकड व सिलिंग फॅन लंपास केला. ही घटना कळंब तालुक्यातील जवळा येथे ८ एप्रिल दरम्यान घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जवळा येथील गणेश लोमटे यांच्या घराच्या परिसरात ६ ते ८ एप्रिल दरम्यान सामसूम असल्याची संधी साधून चोरट्यांनी मोठी लूट केली. घराच्या जिन्याचे दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.त्यानंतर स्वयंपाक घर व बैठक खोलीच्या दाराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
तेथील कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील ५० हजार रुपयाची रोकड व घरातील पंखा चोरट्यांनी चोरून नेला. ही चोरीची घटना निदर्शनास येताच लोमटे यांनी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चौकशी अंती कारवाई करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- CSK-DC सामन्यात दोन भावांमध्ये झाली काटे की टक्कर
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- आज रंगणार केकेआर vs सनरायझर्समध्ये लढत
- धवन-पृथ्वीची तुफान खेळी; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
- 200 ब्रास वाळूच्या साठ्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्त, गंगाखेड पोलिसांची कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

