🕒 1 min read
जालना: जिल्ह्यात लॉकडाऊन लागल्यामुळे अवैध धंद्यांना ऊत आले आहे. जालना-औरंगाबाद मार्गावर शनिवारी पहाटे नाकाबंदी दरम्यान बदनापूर पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचे देशी दारूचे १०० बॉक्स व टाटा एस वाहन जप्त केले. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था टिकवून राहावी, तसेच अवैध वाहतुकीला आळा बसावा यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत पहाटे तीन ते पाच हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खडेकर हे आज पहाटे तीनच्या सुमारास जालना-औरंगाबाद मार्गावर नाकाबंदी करत असताना, एक टाटा एस वाहन संशयितरित्या जाताना दिसले. पोलिसांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये देशी दारूचे १०० बॉक्स आढळून आले.
याबाबत चालकाकडे विचारण केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी दारूच्या बॉक्ससह वाहन ताब्यात घेतले. चौकशीत गाडीतील दोघांनी आपली नावे राहुल किसन वाढेकर, मंगेश देविदास नाईक असे सांगितले. मुद्देमालाबाबत अधिकृत माहिती न देता आल्याने पोलिसांनी दारूचे बॉक्स व वाहन, असा एकूण चार लाख ४९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित दोघांविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालना; २२ लाखांचे कांदा बियाणे चोरणारा गजाआड
- ‘गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील’
- सहा वर्षात पहिल्यांदाच धोनीच्या नावावर नकोसा विक्रम
- …अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही, व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकार विरोधात एल्गार
- लस वितरणात कोणतंही राजकारण नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री

