Share

महिलादिनी केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी बर्गर किंगची माफी

Published On: 

नवी दिल्ली: ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. अनेक भागातून महिला दिनानिमित्त महिलांचे कौतुक करण्यात आले त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. असे सर्वत्र चित्र असताना दुसरीकडे महिला दिनाच्या शुभेच्छा देताना ‘महिलांची जागा स्वयंपाकघरात’ अशा आशयाचे ट्विट फूड चेन बर्गर किंगने केल्यामुळे सर्व भागातून संताप व्यक्त केला जात आहे. परंतु यानंतर बर्गर किंगने हे वादग्रस्त ट्विट हटवत महिलांची माफी मागितली आहे.

अमेरिकेतील शाखेने पाककला स्कॉलरशिपची माहिती देताना सोमवारी फूड चेन चालवणाऱया बर्गर किंगने हे वादग्रस्त ट्विट केले होते. सद्य या प्रकरणावरून या ट्विटवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाता आहे. यासोबतच प्रतिस्पर्धी केएफसी कंपनीनेदेखील बर्गर किंगला फटकारले आहे. काही जणानानी यामुळे फूड चेन बर्गर किंगचा देखील अपमान केला आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये बर्गर किंगने आपली भूमिका स्पष्ट करत म्हंटले आहे की, अमेरिकेत 24 टक्के महिला शेफ कार्यरत आहेत. तर मुख्य शेफ पदावर केवळ 7 टक्के महिला आहेत. आमच्या किचनमध्ये केवळ 20 टक्के महिला शेफ आहेत. महिलांचे या बाबीकडे लक्ष वेधले जावे अशी आमची इच्छा होती, असे सांगत बर्गर किंगने पहिल्या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!