औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कन्नड तालुक्यातील वाकी येथील महाशिवरात्री उत्सव रद्द करण्यात आला आहे. शिवेश्वर देवस्थानचे उत्तर अधिकारी नामदेव महाराज यांनी पत्रकाद्वारे उत्सव रद्द करण्यात आल्याचे कळवले आहे.
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून जवळ असलेल्या वाकी देवाची येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव होत होतो. परिसरातील अनेक गावांतील नागरिक महाशिवरात्रीच्या निमित्ताने वाकी येथे मोठ्या संखेने दाखल होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रद्द करण्यात आल्याचे नामदेव महाराज यांनी एक पत्रक काढून कळवले आहे. कोरोनामुळे खबरदारी घेत मोजक्याच भाविक भक्तांना गर्दी न करता सभामंडपातून दर्शन घेता येईल. किमान सहाशे फुटाच्या अंतरावरुन व शिवरात्रीच्या दिवशी वैयक्तिक नामदेव महाराजांच्या हस्ते शिवेश्वर भगवंता चरणी अभिषेक करण्यात येईल. नंतर मंदिराचे मुख्यद्वार बंद असेल सभामंडपातूनच दर्शन घेता येईल, असे या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्कचा वापर करावा, प्रत्येकाने दैनंदिन जीवनात आपल्या तोंडावर मास्क लावावे असे आवाहन शिवेश्वर देवस्थानचे उत्तराधिकारी नामदेव महाराज यांनी केले आहे. शासनाचे सर्व नियम पाळून वाकी परिसरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आपण मास्कचे वाटप करणार असल्याचे नामदेव महाराज यांनी सांगितले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

