🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील सातारा, देवळाई, इटखेडा या विस्तारित वसाहतींची लोकसंख्या जवळपास दीड लाखापेक्षा जास्त असून या विस्तारित वसाहतींसाठी सातारा परिसरात नवीन शासकीय रूग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण(Satish Chavan) यांनी आज (दि. २३) विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केली.
औरंगाबाद शहरातील लोकसंख्या वाढल्याने या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. या भागात राहणारे बहुतांश कुटुंब हे सर्वसाधारण सिमित उत्पन्न असणारे असून त्यांना खासगी रूग्णालयात उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. तर या वसाहतींपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), जिल्हा रूग्णालय जवळपास ७ ते ८ कि.मी. असल्याने याठिकाणी जाणे-येणे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.
सातारा गावात महानगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते फक्त साथरोग निवारण व लसीकरणापुरते मर्यादित आहे. या भागात मोठ्या रूग्णालयाची आवश्यकता असून तशी मागणी देखील या भागातील नागरिकांमधून होत आहे. सातारा परिसरात शासकीय जमीन देखील उपलब्ध असल्याने याठिकाणी शासकीय रूग्णालय उभारले जाऊ शकते. याठिकाणी रूग्णालय उभारले तर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- “सत्ता गेल्यानं आलेला हताशपणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”
- “राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही”
- जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर, पहा भन्नाट व्हिडीओ
- तुकाराम सुपेच्या कार्यालयात आणखी सापडलं ३३ लाखांचं घबाड
- महाराष्ट्र एकीकरण समितीची ‘सिल्व्हर ओक’वर धाव; राज्यातील खासदारांना पवार करणार एकत्र


