🕒 1 min read
औरंगाबाद : पैठण शहरातील जुन्या नागरी वसाहतीसाठी १३२ केव्ही स्वतंत्र विद्युत सबस्टेशन निर्माण करावे तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पालिका गट नेता हसनोद्दीन कट्यारे यांनी ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत यांच्या कडे केली आहे
निवेदनात पैठण शहर हे ऐतिहासिक असून शहराचा वेगाने विकास होत असल्याने शहराच्या सीमा वाढत आहे तसेच झपाट्याने लोकसंख्या देखील वाढत असून शहरात नविन वसाहती देखील मोठ्या प्रमाणात वसलेल्या आहेत . त्यामुळे जुन्या पैठण शहरातील नागरी वसाहतीतील नागरीकांना ज्या सब स्टेशन मधुन विद्युत पुरवठा होतो ते जवळपास ३ कि.मी. अंतरावर आहे त्यामुळे जुन्या पैठण भागात विद्युत पुरवठा कमी अधिक दाबाने तसेच विजेचा अधिक विजेचा भार असल्याने जुन्या भागातील पावर हाऊस,जुनी तहसील परिसर ,नेहरू चौक, जोहरीवाडा, नाथगल्ली,रेणुकादेवी गल्ली,रंगारहट्टी, दुर्गावाडी,आतील नाथ मंदिर भाजी मार्केट परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरीकांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागते .
तसेच अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर तो लवकर वेळेत सुरळीत होत नसल्याने विजे अभावी नागरीकांना त्रास सहन करावा लागतो . तसेच सब स्टेशन जुन्या भागा पासून दुर अंतरावर असलेल्या नविन रामनगर भागातील सबस्टेशनवर विजे बाबत तक्रारी असल्यास जाणे येण्याच्या दृष्टीकोनातून नविन सबस्टेशन लांब असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो . तरी आपणास विनंती की , जुन्या पैठण शहरातील नागरीकांच्या सोईच्या दृष्टीकोनातून पैठण शहरातील उपकार्यकारी अभियंता कार्यालय पैठणच्या परिसरात असलेल्या मोकळ्या विस्तीर्ण जागेत नविन आणखी एक सबस्टेशन मंजुर करुन पैठण शहरातील जुन्या भागातील नागरीकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
