Share

बजेट हे देशासाठी असावं, निवडणुकांसाठी नाही – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर, भाजप नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी अर्थसंकल्पाबाबत प्रश्न केला असता, ‘मी लगेच काही बोलणार नाही. थोडा वेळ घेईन. लगेच बोलणं योग्य नाही. अजून बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. मात्र जे कानावर आलं आहे त्यावरून एवढंच बोलेन की, बजेट हे देशासाठी असावं, निवडणुकांसाठी नाही’ असा टोमणा त्यांनी भाजपला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिटे बोलावं – निलेश राणे

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी देखील अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कागद न घेता अर्थसंकल्पावर ३० मिनिटे बोलून दाखवावं असं निलेश राणे म्हणाले आहेत. ‘देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे… अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिट बोललं पाहिजे.’ असं खुलं आव्हान राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!