🕒 1 min read
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. अर्थसंकल्पी भाषणादरम्यान त्यांनी वस्तू आणि सेवा कराची माहिती दिली.
‘जीएसटी’ने मागील दोन वर्ष आव्हानांचाही सामना केला, पण बदल करण्यासाठी जीएसटी परिषदेने काम केलं. आतापर्यंत आपल्याला नवीन १६ लाख करदाते मिळाले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला होता. त्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न जीएसटी कौन्सिलकडून केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं सावट देशावर आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधक सातत्याने निशाणा साधत आहेत. ही सगळी आव्हानं पेलत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करीत आहेत.
दरम्यान, जीएसटीमधील कपातीचा ग्राहकांना फायदा झाला. ग्राहकांचे जवळपास १ लाख कोटी वाचले असा दावा सीतारामन यांनी केला. एप्रिलपासून जीएसटीची नवी सुधारित आवृत्ती लागू होईल. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
