Share

‘मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

बिहारची निवडणूक नजरेसमोर ठेवून हा मुद्दा रंगवण्याचा अत्यंत गलिच्छ प्रकार भाजपाच्या प्रवक्त्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता त्यामध्ये दावा करणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात उतरले आहेत. मात्र सुशांतने आत्महत्या केली हे आता एम्सच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सुशांतसिंग याने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्समधील डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पथकाने दिलेला असून मुंबई पोलीसांचे चारित्र्य उजळून निघाले आहे. त्यांनी केलेली चौकशी प्रामाणिक व योग्य दिशेनेच चालली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलीसांचा तपास योग्यच होता असे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणारा भाजपा उघडा पडला असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध लावण्यासाठी आता महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!