Share

लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली

Published On: 

पटना- बिहार विधानसभा निवडणूक 2020 जाहीर झाली आहे. जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी खलबत सुरु आहे. एनडीएचा घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पार्टी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा करत आहे. अशातच लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे.

रामविलास पासवान यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या रामविलास पासवान यांची अचानक तब्येत खालावल्याने शनिवारी दिल्लीत त्यांची हार्ट सर्जरी केली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान यांच्यावर रुग्नालयात उपचार सुरु होते. काल एकदम त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने चिराग पासवान संसदीय बैठक सोडून गेले होते. रामविलास पासवान यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक 2020 एनडीए आज जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. आजच्या जागावाटपात नीतीश कुमार यांचा जदयु बिग ब्रदर राहणार की वेगळ्य भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी भूमिका स्पष्ट केल्यास एनडीएचे जागावाटप लवकर होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!