Share

सावधान ! चक्रीवादळामुळे उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट

Published On: 

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, सध्या अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांत तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. गोव्यानंतर आता चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणात दिसत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. उद्या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळामुळे उद्या म्हणजेच 17 मे रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता सदर दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे.

तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई चर्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गस्त घातली जात आहे. दादरच्या किनारपट्टीवर महापालिकेने लाईफ गार्ड तैनात केले असून सात जणांची टीम कुणालाही समुद्रात जाण्यापासून मज्जाव करत आहे.

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये. त्याशिवाय ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली आहे. तसेच सध्या प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!