औरंंगाबाद : भंगार साहित्याचे गोडावून फोडून ६५ हजारांचा ऐवज चोरणा-या रवि रमेश गायकवाड (वय ३२), बाळु रावसाहेब गायकवाड (वय २२), विजय दामोधर चौथमल (वय ४२, सर्व रा. ब्रिजवाड) आणि भानुदास दामोधर मोरे (वय ५५, रा. राजेंद्रनगर, नारेगाव) या चौघांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी शनिवारी (दि.१५) दिले.
नारेगाव येथील राजेंद्रनगरात राहणारे राजेश गुनानंद झा (वय ३६, मुळ रा. बेलाम, रैयम ता. रहिकाजि. मधुबन, बिहार) यांची एमआयडीसीत मुस्कान स्टील नावाचे भंगारचे गोडावून आहे. ११ मे रोजी सकाळी झा हे नेहमी प्रमाणे गोडावून गेले
त्यांना गोडावूनच्या भिंती लगत अल्यूमिनीयम आणि लोखंडाचे सामान पडलेले दिसले. त्यांनी गोडावूनची पाहणी केली असता ६५ हजारांचे साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- संकटात भर : चक्रीवादळाचा कोकणासह मुंबईतील ऑक्सिजन प्रकल्पांना धोका; सतर्कतेचे आदेश
- सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप नेमणार कायदेतज्ज्ञांची समिती : चंद्रकांत पाटील
- ‘मराठा आंदोलने होऊ नये म्हणून कोरोनाचे निर्बंध, भाजप आंदोलनात भाग घेणार’
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- औरंगाबादेत शिवसेना-एमआयएमच्या वादात प्रलंबित राहिलेल्या ‘या’ कामास मिळाली गती!


