बीड: लाच देणे आणि लाच घेणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत, मात्र फार कमी लोकं या विरोधात आवाज उठवतात. पैस्यांचा मोह प्रत्येकालाच आवरेल असं नाही. असाच लाचेचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. दारू प्रकरणात गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ७५ हजारांच्या लाचेची मागणी करून ५० हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्काचा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडला आहे. धानोरा रोडवरील कार्यालयात औरंगाबादच्या पथकाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली.
दारू प्रकरणात दाखल गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ७५ हजारांच्या लाचेची मागणी करून ५० हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. नागापूर शिवारात ७ एप्रिल २०२१ रोजी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक व सहकाऱ्यांनी बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला होता. त्यानंतर अशाच प्रकारे बीडमधील एमआयडीसीतही बनावट दारूचा प्लँट सुरू असल्याचे समोर आल्यावर तेथेही छापा टाकला होता. यात ८६ लाख १९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणाचा तपास दिंडकरकडे देण्यात आला होता. तपासातील एक आरोपी व तक्रारदार व्यक्ती यांच्यात लाखोंचे व्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यावरून तक्रारदारालाही गुन्ह्यात आरोपी केले होते. तक्रारदाराने अटकपूर्व जामीन करून घेतला होता. दरम्यान, गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ७५ हजारांची मागणी दिंडकरने केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार आल्यानंतर सापळा लावला. ५० हजार रुपये लाच स्वीकारताना दिंडकर एसीबीच्या सापळ्यात अडकला. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला.
महत्वाच्या बातम्या
- जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करणार? ‘त्या’ स्पर्धेवरून पडळकरांचा हल्लाबोल
- डेव्हिड मिलरला विचारला धोनीबाबत प्रश्न ; उत्तर ऐकून वाटेल अभिमान
- जालन्यात १०७ नव्या रुग्णांची भर तर ४१० जणांची कोरोनामुक्ती!
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- राज्याच्या जीएसटी वसुलीत मोठी घट, लॉकडाऊनच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला फटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

