Share

लॉकडाऊन काळात नियम न पाळणे ; मालेगावकरांना पडले ‘ महागात ‘

Published On: 

मालेगाव : सध्या लागू असलेल्या संचारबंदीचे नियम पाळा अन्यथा मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल या सरकारच्या चेतावणीचा प्रत्यय मालेगावकरांना आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकट्या मालेगाव मध्ये ३० कोव्हीड-१९ संसर्ग बाधित रुग्ण झाले आहे.

दरम्यान, या पूर्वी संचारबंदी लागू केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना मालेगाव मधून समोर आल्या होत्या आणि या घटना अजूनही सुरूच आहे. ग्रीन झोन मध्ये असलेला नाशिक जिल्हा मालेगाव मुळे रेड झोन मध्ये आला आहे. तत्पूर्वी मालेगावमध्ये ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगावकरांनी सतत नियमाचे उल्लंघन करत संचारबंदी नंतरही अनेक ठिकाणी गर्दी केली. बऱ्याच नागरिकांना शासनाच्या घराबाहेर न निघण्याच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक वाटले नाही.

त्यामुळे येथे कोरोनाने झपाट्याने पाय पसरले व नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांमुळे नियमांचे पालन करणाऱ्या काही नागरिकांना देखील धोका निर्माण झाला आहे. मालेगावमधील कोरोनाचे वाढते संकट पाहता मालेगावकर आता तरी सुधारतील का नाही ? असा प्रश्न सर्वांनाच पाडला आहे. स्वतः साठी नाही तर किमान आपल्या कुटुंबासाठी आणि जे काही नागरिक नियमांचे पालन करत आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा सर्वांना आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!