🕒 1 min read
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचा देखील समावेश असून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत परळी विधानसभेत विजय मिळवला होता. तर, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं होत. यानंतर राजकीय पुनर्वसनावरून पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाशी विसंगत काही भूमिका देखील केल्या होत्या.
राज्यसभा खासदार, विधान परिषद आमदार, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये देखील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे व पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्याचे दिसून आले होते. मात्र, आता पंकजा मुंडे व विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड करण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करून त्यांना सक्रिय करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे दिसून आलं आहे.
नाथाभाऊ मात्र अद्याप उपेक्षितच?
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त पसरले होते, जे त्यांनी नाकारत भाष्य करण्यास टाळले होते.
महत्वाच्या बातम्या :-
- दीपिकाची ५ तासांपासून चौकशी सुरूच, तर धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक
- बिहार निवडणुकीत सुशांत हा प्रचाराचा मुद्दा असावा यासाठी केंद्रासह बिहार सरकारचा प्रयत्न : संजय राऊतांचा भाजपला टोला
- नाशिक मध्ये मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक
- कर्जतच्या उपकारागृहातील एकाचवेळी २७ कैद्यांना कोरोनाची लागण
- प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी अन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी का होतेय हे पद भरण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
