🕒 1 min read
मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची काल निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे.
बिहार निवडणुकांच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण देखील तापत असल्याचे आता दिसून येत आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकांच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. ‘बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढवली जावी. जर बिहार निवडणुकीत काही मुद्दे कमी पडलेच तर मुंबईहुन पार्सल केले जातील’ असे विधान त्यांनी एएनआय वाहिनीशी बोलताना केले आहे.
बिहार निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर कालच संजय राऊत यांनी, तिथला कोरोना संपला का? असा खोचक सवाल केला होता. तर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा देखील बिहारच्या निवडणुकीत प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
देशाच्या राजधानीत कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही संसदेचं अधिवेशन घेऊ शकत नाही आणि बिहारसारख्या राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये कोरोना संपला का? हे पाहावं लागेल. सरकारला, तिथल्या राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला वाटलं असेल की कोरोना संपला आणि आम्ही निवडणुका घेतोय तर त्यासंदर्भात तसं जाहीर व्हायला पाहिजे. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील.
बिहारमधील मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्मावर होतं. तिथे अनेकदा गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो. त्यांच्या सरकारविषयी सुप्त राग आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हा प्रचाराचा मुद्दा असावा यासाठी केंद्र आणि बिहार सरकार मिळून त्याच्या मृत्यूचं राजकारण केलं. जनता दल युनायटेड या पक्षाने सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर प्रचारात आणले आहेत.
तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, कामाचे मुद्दे नाही, सुशासनचा मुद्दा नाही, म्हणून मुंबईचे मुद्दे जबदस्तीने प्रचारात आणले आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये पडदा ओढण्याचं काम केलं त्यांनी राजीनामा दिला ते बक्समधून निवडणूक लढत आहेत. हे सगळं आधीच ठरलं होत, त्यानुसार हे नाट्य पुढे चाललं आहे, अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- नगरमध्ये डाव्या पक्षांच्यावतीने शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध
- मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण: खा. संभाजीराजे
- दीपिकाची ५ तासांपासून चौकशी सुरूच, तर धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला अटक
- मराठा समाजाच्या हितासाठी सर्वांना एकत्र यावेच लागेल – शिवेंद्रसिंहराजे भोसले
- नाशिक मध्ये मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
