परभणी: कोरोनाच्या पार्श्वभूमी जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लावले आहे. तरीही शहरातील काही व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन दुकाने उघडून विक्री सूरु ठेवल्यामुळे आठ व्यापाऱ्यांविरूध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सरास खरेदी विक्री चालु आहे ही गंभीर बाब असुन याचे पालन होत नसल्यांने आठ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. अत्यावश्याकसाठी काहींना सुट दिली त्यामुळे जिल्ह्यात मेडिकल दुकानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर संचारबंदी व लॉकडाऊन आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनावर टाकली आहे. तेव्हा गंगाखेड नगरपालिकेचे पथक गुरूवारी सकाळी ११ ते २ या वेळेत बाजारपेठेत पाहणी करून कारवाई करण्यासाठी फिरत होते. त्यावेळी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक मोहम्मद अफजलोद्दीन मोहम्मद फिरोजद्दीन यांच्या पथकाला बाजारपेठेतील काही दुकाने उघडलेली आढळून आली. त्यामुळे त्यांनी या दुकानदारावर कारवाई केली.
दरम्यान एकीकडे कोरोनाचा संसर्गाचा जिल्ह्यात जोरात पैलाव होत आहे त्यात काही महारथी सरास दुकान उघडुन माल विकत आहे याला लगाम बसण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये संचिता इलेक्ट्रॉनिक्स, विनोद अनिल कंठेवार, किसन बालाजी नळदकर, मंचक नळदकर, श्री गुरुकृपाचे मालक कपिल निरस यांनी आपली आस्थापना उघडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी न.पा.चे पथक प्रमुख मोहम्मद अफोजलोद्दीन मोहम्मद फिरोजोद्दीन यांच्या फिर्यादीवरून ८ व्यापाऱ्यांवर गुरनं १३५/२१ कलम १८८, २६९, २७० भादंविप्रमाणे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत मोकाट फिरणाऱ्या ९० जणांची तपासणी; ४ जण कोरोना बाधीत
- राधेचा ट्रेलर पाहुन टायगर झाला दिशा पाटनीवर फिदा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत केले कौतुक
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत
- माधुरी देत आहे मास्क लावण्याचे धडे : पहा व्हिडीओ
- माझी बांधिलकी सरकारशी नाही राज्यातील जनतेशी, ट्रोलरला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

