Share

Breaking : आतंकवाद्यांना आर्थिक रसद पुरवठा केल्याप्रकरणी ५ जणांना अटक 

Published On: 

श्रीनगर – दहशतवाद्यांना आर्थिक रसद (टेरर फंडिंग) पुरवली जात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)ने आज जम्मू-कश्मीरच्या अनंतनागसह पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये एका 36 वर्षीय महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आयएसआयएसकडून फंडिंग होत आहे का याचाही ‘एनआयए’ शोध घेत आहे.

अनंतनाग येथे चार ठिकाणी तर श्रीनगर येथे एका ठिकाणी ‘एनआयए’ने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने छापे टाकले आहेत. दरम्यान, अटक केलेल्या महिलेकडून चायनीज ग्रेनेड आणि 48 हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. तसेच हाका बाजार येथील रहिवासी असलेल्या अदनान अहमद नदवी या व्यक्तीला अटक करून लॅपटॉप आणि काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

दरम्यान, जम्मू-कश्मीर प्रशासनाने शनिवारी सुरक्षा दलाच्या हालचालींची माहिती दहशतवाद्यांना पुरवल्याच्या व आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली 11 सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कुख्यात दहशतवादी सय्यद सलाउद्दीन याच्या दोन मुलांना या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!