Share

ब्राम्हण समाजाला ३३ टक्के आरक्षण द्या,निवृत्त न्यायमूर्ती राजन कोचर यांची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  मराठा आरक्षणानंतर आता ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. एकूण आरक्षण ६७ टक्क्यांवर पोहोचले असून आता फक्त ३३ टक्के समाज आरक्षणाशिवाय आहे. ज्या समाजाला आतापर्यंत तथाकथित उच्चभ्रू म्हणून संबांधले जाते, ज्या शेष वर्गात माधुकरीवर उदरनिर्वाह करणारा गरीब ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत व वैश्य समाज आहे. या वर्गासाठी आता ३३ टक्के आरक्षण राखून ठेवावे, अशी मागणी निवृत्त न्यायमूर्ती राजन कोचर यांनी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सला पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली आहे.

गरीबीची कसोटी लावली तर ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासच म्हटला पाहिजे. ब्राम्हण, कायस्थ, सारस्वत समाजातील व्यक्तींनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. मराठा, वैश्य तसेच पारशी समाजातील न्यायाधीशांनीही आपल्या कुवतीनुसार भर घातली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना त्यांच्या हक्काचा ३३ टक्के आरक्षणाचा वाटा नाकारून त्यांच्यावर अन्याय तर होत नाही ना, हे पाहिले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

लढाई श्रेयवादाची : मराठा आरक्षण हा माझा विजय : नारायण राणे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!