Share

#Boycott_Amazon| श्रीकृष्णची अश्लील पेंटींग अॅमेझाॅन वर पाहून नेटकरी संतापले, कारवाईची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त अनेक लोकांनी राधा कृष्णाचे मूर्ती अथवा पेंटिंगची खरेदी केली. याच निमित्ताने ॲमेझॉनने देखील आपल्या वेबसाईटवर भगवान श्रीकृष्ण यांची अश्लील पेंटिंग विक्रीसाठी दाखवली. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून #Boycott_Amazon हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

#Boycott_Amazon ट्रेंडिंग हॅशटॅगः

नेटकरांनी ॲमेझॉन वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ॲमेझॉन कडून अशा गोष्टी यापूर्वी ही घडल्या असल्याने या वेळेस कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ॲमेझॉन वर बहिष्कार टाकण्यासाठी युजर्सने #Boycott_Amazon असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आणला आहे.

श्रीकृष्णची अश्लील पेंटींगः

अनेकांनी #Boycott_Amazon चा वापर करून ट्विट केलं आहे. संबंधित पेंटिंग मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा एका झाडाखाली नग्न दाखवले आहेत. तसेच हे पेंटिंग ॲमेझॉन वर गीता गोविंदा, राधाकृष्णन फॉरेस्ट या नावाने विकले जात आहे. या पेंटिंगची फ्रेम साइज 12×13 देण्यात आली आहे.

ॲमेझॉनने संबंधित पेंटिंग डिलीट केली असली तरी अनेक युजरने आपल्या मोबाईल मध्ये याचा स्क्रीन शॉट घेतला आहे. तसेच जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे चित्र अशा प्रकारे प्रदर्शित करणं हा कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान केल्यासारखा आहे, असं ट्विट अनेकांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!