मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.
या सामन्यात न्युझीलंडचा अर्धा संघ १३५ धावांवर माघारी परतला होता. त्यावेळी न्युझीलंडचा डाव लवकर संपुष्टात आणून भारतीय संघाला आघाडी घेण्याची चांगली सुवर्णसंधी होती. मात्र नेहमीप्रमाणे प्रतिस्पर्धी संघातील तळाच्या फलंदाजानी भारतीय गोलंदाजाना त्रास दिला. न्युझीलंडचे तळाचे फलंदाज कायली जेमीसनने २१ आणि टीम साऊदीने ३० धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत तब्बल ५१ धावांची भर घातली. या धावांच्या जोरावर न्युझीलंडला पहिल्या डावात ३२ धावांची निर्णायक आघाडी मिळवता आली.
तर एकीकडे भारताच्या डावात तळाचे फलंदाज केवळ आठ धावांची भर घालु शकले. प्रतिस्पर्धी संघाच्या तळाच्या फलंदाजाना बाद करण्यात भारतीय गोलंदाज नेहमीच अपयशी ठरले आहे. आणि यामुळे अनेक सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. हीच चुक डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला महागात पडु शकते. पाचव्या दिवसाअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाच्या खेळीवर सामन्याचा निकाल अवलंबुन आहे.
महत्वाच्या बातम्या
- सावधान ! ‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
