Share

रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं आहे. ओव्हल कसोटी भारतीय फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. पहिल्या डावातील खराब कामगिरीला मागे टाकत भारताने कसोटी सामन्यावर पकड मजबूत बसवली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं शतक आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी-अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाअखेरीस १७१ धावांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस कमी प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. तेव्हा भारताने ३ विकेटसह २७० रन्सपर्यंत मजल मारली होती. कर्णधार विराट कोहली २२ तर रविंद्र जाडेजा ९ धावांवर क्रीजवर आहेत. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल  यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित आणि राहुल यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी झाल्यानंतर जेम्स अँडरसनने लोकेश राहुलला आऊट केलं. राहुल ४६ धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. मैदानात आलेल्या पुजाराने रोहितला उत्तम साथ दिली.

यानंतर दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली. यानंतर रॉबिन्सनच्या बॉलिंगवर पूलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वोक्सकडे कॅच देऊन आऊट झाला. त्याने २५६ बॉलमध्ये १४ फोर आणि १ सिक्स लगावत १२७ रन्स केल्या. यासह रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आपले पहिले शतक साजरे केले. रोहित पाठोपाठ देखील रॉबिन्सनच्या बॉलिंगवर मोईन अलीकडे कॅच देऊन पुजाराही आऊट झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने उरलेली षटकं खेळून काढत भारताची पडझड थांबवली. आता टीम इंडिया चौथ्या दिवशी आपली आघाडी किती धावांनी वाढवतो आणि इंग्लंडला विजयासाठी किती धावांचं आव्हान देतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!