Share

बूम बूम बुमराह…कसोटीत १०० बळींचा टप्पा अवघ्या २४ सामन्यात गाठून रचला खास विक्रम

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे सुरु असलेला चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य मिळाले. खेळाच्या चौथ्या दिवशी, इंग्लंड संघाने त्यांच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या सर्वोत्तम सुरुवातीच्या आधारावर कोणतेही नुकसान न करता 77 धावा केल्या होत्या. आजचा म्हणजेच पाचवा दिवस दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार असून क्रिकेट रसिकांचे लक्ष सुरु असलेल्या सामन्याकडे लागले आहे.

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण असा टप्पा गाठला आहे. केवळ २४ कसोटी सामन्यात बुमराह याने कसोटीमधील १०० बळी घेत भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. १०० बळींची संख्या सर्वात कमी सामन्यांमध्ये गाठणारा वेगवान गोलंदाज ठरला असून त्याने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना मागे टाकले आहे.

कोणत्या वेगवान गोलंदाजांचे १०० बळी पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत नाव ?(सोबत किती सामन्यांमध्ये याचे आकडे)

जसप्रीत बुमराह-२४ सामने, कपिल देव-२५ सामने, इरफान पठाण-२८ सामने, मोहम्मद शमी – २९ सामने, जवागल श्रीनाथ – ३० सामने, इशांत शर्मा – ३३ सामने.

दरम्यान, इंग्लंडचे ६ खेळाडू बाद झाले असून भारताला विजयासाठी केवळ ४ बळींची गरज आहे. तर इंग्लंडसमोर अद्यापही २१९ धावांचा डोंगर आहे. पहिल्या डावात खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र चांगली कामगिरी करत इंग्लंडसमोर धावांचा डोंगर रचला. चौथ्या दिवशी इंग्लंडने एकही विकेट गमावली नसल्याने त्यांची स्थिती देखील चांगली होती. मात्र, सध्याच्या स्थितीनुसार भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडच्या खेळाडूंवर दबाव निर्माण केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!