मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचं ‘मुखपत्र’ मानल्या जाणाऱ्या ‘पांचजन्य’मध्ये देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसला लक्ष्य करण्यात आले आहे. ‘पांचजन्य’च्या आवृत्तीत इन्फोसिसबद्दल चार पानांची कव्हर स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे. यात इन्फोसिसवर अनेक आरोप करण्यात आले असून, ‘आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही,’ असंही म्हटलं आहे. ‘देशविरोधी शक्ती इन्फोसिसच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक हितसंबंधांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत का?’ असा प्रश्न या लेखातून विचारण्यात आला आहे. तसेच इन्फोसिसवर यापूर्वी ‘नक्षलवादी, डाव्या आणि टोळ्यांना मदत’ केल्याचा आरोप असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावरून देशातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या लेखावरून आरएसएस आणि भाजपवर हल्लाबोल सुरू केलाय. काँग्रेसचे राज्यातील मंत्री नितीन राऊत यांनीही टीकास्त्र सोडले आहे. इतर सर्व घटक देशद्रोही आणि एकेकाळी इंग्रजांचंेबूटपॉलिश करण्यात जीवनाचं सार्थक मानणारे फक्त देशभक्त आहेत असा खोचक टोला राऊत यांनी संघाचे नाव घेता लगावला आहे.
मुस्लिम, डावे, विद्यार्थी, विरोधी पक्ष, दलित, शेतकरी, डॉक्टर्स, टाटा आणि इन्फोसिससारखे उद्योगसमूह, हे सगळे देशद्रोही आहेत.
एकेकाळी इंग्रजांचं बूटपॉलिश करण्यात जीवनाचं सार्थक मानणारे फक्त देशभक्त आहेत.
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) September 6, 2021
‘मुस्लिम, डावे, विद्यार्थी, विरोधी पक्ष, दलित, शेतकरी, डॉक्टर्स, टाटा आणि इन्फोसिससारखे उद्योगसमूह, हे सगळे देशद्रोही आहेत. एकेकाळी इंग्रजांचं बूटपॉलिश करण्यात जीवनाचं सार्थक मानणारे फक्त देशभक्त आहेत’ असे ट्विट राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हात वर केले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘त्या’ लेखापासून स्वतःला अलिप्त केल्याचे दिसून येत आहे. या लिखाणाबाबत संघाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांनी याबाबत ट्विट केलं असून, लेखात व्यक्त करण्यात आलेले विचार संघटनचे नाही, तर लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत, असा खुलासा केलाय.
‘एक भारतीय कंपनी म्हणून, भारताच्या प्रगतीत इन्फोसिसचे महत्वपूर्ण योगदान आहे. इन्फोसिसद्वारे संचालित पोर्टलच्या संबंधी काही मुद्दे असू शकतात, मात्र पांचजन्यमध्ये या संदर्भात प्रकाशित लेख म्हणजे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. पांचजन्य संघाचे मुखपत्र नाही’ असं सुनील आंबेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्या तोच भगवा मुंबई महापालिकेवर फडकणारच’; नितेश राणेंचा विश्वास
- महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली; पुण्यात १४ वर्षीय मुलीवर आठ नराधमांनी केला बलात्कार
- दिलासादायक : कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘या’ औषधाच्या वापराला मंजुरी\
- मिलिंद सोमणची रुग्णालयातील पोस्ट पाहून नेटकरी संतापले
- ‘एक अजनबी हसीना से…’; शशी थरूर यांच्या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

