🕒 1 min read
क्राइस्टचर्च : बांग्लादेश विरोधात एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने १६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.या विजयासह न्युझीलंडने बांग्लादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका ही ३-० अशा फरकाने जिंकली आहे. या सामन्यात न्युझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३१८ धावांचे लक्ष्य बांग्लादेशला दिले होते. मात्र या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती ट्रेन्ट बोल्टने हवेत सुर मारत घेतलेला शानदार झेल.
बोल्टने घेतलेला हा शानदार झेल सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खुद्द आयसीसीने ट्विट करत बोल्टने घेतलेल्या झेलाचे कौतुक केले आहे. न्युझीलंड क्षेत्ररक्षण करत असताना बांग्लादेशच्या डावांतील सातव्या षटकादरम्यान मॅट हेन्नरीने टाकलेला चेंडूवर बांग्लादेशचा फलंदाज दासने शॉट मारला. हा चेंडू हवेत थर्डमॅनच्या दिशेने गेला.
तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या बोल्टपासून हा चेंडू लांब होता. बोल्टने धावत जाऊन हवेत सुर मारत आणि एका हाताने झेल घेतला. यानंतर स्वत: बोल्टचा देखील या पकडलेला झेलावर विश्वास बसत नव्हता. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला. या सामन्यात प्रथम फंलदाजी करताना न्यूझीलंडकडुन डेरिल मिचेल आणि डेव्हन कॉनवे यांनी शतक केले होते. ३१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४२.४ षटकात अवघ्या १५४ धावांत आटोपला.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेडमध्ये कोरोनाचा हाहाकार, कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगा
- मराठा आरक्षणाची सुनावणी पूर्ण; आता सकारात्मक निकालाची अपेक्षा – अशोक चव्हाण
- मदत आणि पुनर्वसन विभागाकडून औरंगाबाद मनपाला कोरोनासाठी मिळणार ‘इतका’ निधी
- ‘मनमोहन सिंहांच्या काळात पेट्रोलवर १ रुपया रस्ते विकास कर होता, तो मोदींनी १८ रुपये केलाय’
- मृत्यूपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपाली चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
